भुसावळातील प्रभाग सातमध्ये उद्या रस्ते काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन


भुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून प्रभाग सातमध्ये विविध रस्ते कामांचे भूमिपूजन गुरुवार, 29 रोजी सकाळी 9 ते 10.30 वाजेच्या दरम्यान होणार आहे. यात गोदावरी नगर, मोरेश्वर नगर, सुभाष कॉलनी, राधाकृष्ण रेसीडेन्सी, भाग्यश्री विहार, मोहित नगर, महालक्ष्मीनगर, स्वरुप कॉलनी आदी भागांमध्ये विविध कामे होतील.

माजी नगरसेविका अनिता सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्या पाठपुराव्याने आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून या रस्त्यांना मंजूरी मिळाली आहे. यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !