भुसावळ बसस्थानकात चाकूच्या धाकावर दोन प्रवांशाचे मोबाईल लूटले
At Bhusawal Bus Stand, two foreigner’s mobile phones were looted at knife point भुसावळ : बसच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन प्रवाशांना चाकू दाखवून भामट्यांनी त्यांच्याकडील 32 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लांबवल्याची घटना बसस्थानकात मंगळवारी सायंकाळी सव्वा वाजता घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात संशयित शेख रईस शेख रशीद (मुस्लीम कॉलनी, भुसावळ) व शेख समीर शेख सलीम (अयान कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाकू दाखवून मोबाईल लांबवले
तक्रारदार मनोज सुभाष पाटील (29, खामखेडा, ता.मुक्ताईनगर) व त्यांचे मित्र निखील भारत चिमकर (मुक्ताईनगर) हे बसस्थानकावर मंगळवारी सायंकाळी बसच्या प्रतीक्षेत असताना दोघा भामट्यांनी प्रवाशांना चाकू दाखवून धमकावले व 20 व 12 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात मनोज पाटील यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
