वडगावच्या तरुणीची रावेरनजीक विहिरीत उडी घेत आत्महत्या


A girl of Vadgaon committed suicide by jumping into a well near Raver रावेर : रावेर तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी असलेल्या महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या 19 वर्षीय तरुणीने रावेर शहरानजीकच्या एका शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार गुरूवारी उघडकीस आला. शीतल मुकेश वाघोदे (19) असे आत्महत्या करणार्‍या युवतीचे नाव आहे.

रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
शीतल ही तरुणी बुधवार, 28 जून रोजी कॉलेजला रावेरला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली मात्र घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजूरीचे काम करणार्‍या महिलांना त्याच शेतात असलेल्या विहिरीजवळ शाळेची बॅग व चप्पल आढळल्यानंतर बॅगेची तपासणी केली असता त्यात वडगावचा उल्लेख आढळल्यानंतर तरुणीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर गुरुवारी सकाळी तरुणीचा मृतदेह हाती आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !