डाऊन कटनी पॅसेंजरमध्ये तोतया तिकीट निरीक्षक सुरक्षा यंत्रणेच्या जाळ्यात


Counterfeit ticket inspectors in down cut passenger security net भुसावळ : डाऊन 11127 भुसावळ-कटनी पॅसेंजरमध्ये रेल्वे प्रवाशांकडील तिकीटांची तपासणी करताना परप्रांतीय तोतया तिकीट निरीक्षकांना सुरक्षा यंत्रणांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अरविंद तिवारी (26, उचेहरा, तहसील उचेहरा, जिल्हा सतना) व शुभम पांडे (20, पूर्वा, ता.गर्ग, जि.रेवा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. विशेष म्हणजे तिवारी हा एसी कोच अटेंण्डट तर पांडे हा ओबीएच कर्मचारी आहे.

प्रवाशांकडून रक्कम वसुल करताना कारवाई
डाऊन भुसावळ-कटनी पॅसेंजरमध्ये दोन तिकीट निरीक्षक प्रवाशांकडील तिकीटांची तपासणी करीत असून ते तोतया असल्याचा संशय प्रवासी भोलेनाथ प्रेमनाथ गौर (68, भुसावळ) यांनी व्यक्त करीत रावेर रेल्वे स्थानकावरील कर्मचार्‍याला माहिती दिल्यानंतर कॉन्स्टेबल रामब्रेश यांनी दोघांना पकडून भुसावळ यार्डातील आरपीएफ स्टेशनमध्ये आणल्यानंतर सौनी विकास साळुंके यांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर संशयितांविरोधात भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !