पाडळसे गावात मोर नदीजवळ लावलेल्या ट्रॅक्टर बॅटरी लांबवली
Thieves removed the battery of a tractor installed near Mor river in Padalse village यावल : तालुक्यातील पाडळसे येथील गावाजवळ मोर नदीच्या बाजूला रॉकेल डेपोमध्ये लावलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
पाडळसा, ता.यावल येथील मोर नदीकाठी रॉकेल डेपोजवळ मुकुंदा पंढरीनाथ सपकाळे (अंजाळे, ता.यावल) यांनी आपले ट्रॅक्टर लावले होते. त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये लावलेली आठ हजार रुपये किंमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने संधी साधून लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुकुंदा सपकाळे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास सोनवणे करीत आहे.



