वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीत महिलेला मारहाण ; कारच्या काचाही फोडल्या


Woman beaten up in Varangaon Ordnance Factory Colony; Car windows were also broken भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीतील 42 वर्षीय महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत बहिण-भावांनी महिलेस मारहाण करीत कारच्या काचा फोडल्या तसेच घरातील टीव्हीदेखील फोडून नुकसान केले. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. महिलेचे संशयिताच्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही घटना घडली. या प्रकरणी संशयित कुणाल सुधीर सोनार व वैष्णवी सुधीर सोनार यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
42 वर्षीय महिलेने वरणगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजता संशयितांनी अनधिकृतरीत्या घरात प्रवेश करीत शिविगाळ सुरू केली तसेच छातीत लाथ मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच तक्रारदार महिलेची चारचाकी (एम.एच.19 ई.ए.5249) चा मागील काच फोडला तसेच घरातील तोशिबा कंपनीचा टीव्ही फोडून नुकसान केले. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नावेद अली करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !