A suspect in the crime of torture committed suicide in Faizpur police station फैजपूर पोलीस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न


A suspect in the crime of torture committed suicide in Faizpur police station यावल : फैजपूर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित रामचंद्र संघरत्न वाघोदे (वडगाव, ता.रावेर) यास अटक करण्यात आली होती मात्र संशयिताने लॉकअपमध्ये हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजता घडली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
यावल तालुक्यातील 32 वर्षीय तरुणीशी संशयित रामचंद्र याने प्रेमसंबंध प्रस्थापीत करीत लग्नाचे आश्वासन दिले होते मात्र तरुणीला गारबर्डी धरण, भुसावळातील दोन हॉटेल्समध्ये 2017-2018 ते आतापर्यंत वेळोवेळी आरोपीने नेत तिच्यावर इच्छेविरोधात शारीरीक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले व त्यातून पीडीता तीनेवळा गर्भवती राहिली मात्र आरोपीने आयुर्वेदिक गोळ्या देवून पीडीतेचा गर्भपात केला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती.

हातावर ब्लेड मारत आत्महत्येचा प्रयत्न
आरोपीला फैजपूर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने हातावर धारदार ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्यास तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले. या प्रकरणी पोलीस नाईक बाळू नरसिंग भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रामचंद्र वाघोदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कोठडीतच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !