भुसावळात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त


Dumper seized for illegal sand transport in Bhusawal भुसावळ  : शहरातील वांजोळा रोडवर शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास प्रभारी तहसीलदार अंगत आसटकर व त्यांच्या सहकार्‍यांनी वाळूने भरलेले डंपर पकडून तालुका पोलिसात जमा केल्याने वाळू वाहतूकदरांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या डंपरला नंबर प्लेट सुध्दा नसल्याचे सांगण्यात आले.

कारवाईने उडाली खळबळ
प्रभारी तहसीलदार अंगत आसटकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांच्यासह मंडळाधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी पवन नवगाळे, विशाखा मुन, सुनीता वाघमारे, माधुरी सोनवणे, नितीन केले, जितू चौधरी, जयराज भालेराव यांनी शुक्रवारी रात्री वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई केली. रात्री संधी साधून चालक पसार झाला. याप्रकरणी महसूल विभागातर्फे आरटीओ यांना माहिती देण्यात आली आहे. त्याच्याकडून डंपरची तपासणी केली जाणार आहे. डंपर पकडल्याचा अहवाल प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेवरून महसूल विभागात रात्री अवैध वाळूचे डंपर पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून आता रात्री चालणारी डंपर जमा केली जाणार आहे, असल्याचे सूत्रांनी सागितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !