पारंबीतील अल्पवयीन तरुणाचा शेतात विद्युत शॉक लागल्याने मृत्यू : भाऊ जखमी
Parambi minor dies due to electric shock in farm : Brother injured मुक्ताईनगर : तालुक्यातील पारंबी गावातील अल्पवयीन तरुणाचा शेतात शूक लागल्याने मृत्यू झाला तर भावाला वाचवण्यासाठी गेलेला मोठा भाऊ देखील या घटनेत जखमी झाला. गौरव संतोष झांबरे (17) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवार, 1 रोजी सकाळी 10 वाजता ही घटना घडली.
अशी घडली घटना
मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथील शेतकरी संतोष झांबरे यांना चेतन व गौरव ही दोन मुले असून मोठा मुलगा चेतन हा जळगावात शिक्षण घेतो तर गौरव याने नुकतीच दहावीची परीक्षा 83 टक्के गुणांनी उत्तीर्ण केली होती. शनिवारी सकाळी दहा वाजता दोन्ही भाऊ शेतात गेले असता गौरवला शेतातील विजेच्या वायरचा जबर शॉक बसल्याने तो चिपकल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी त्याचा मोठा भाऊ चेतन हा गेल्यानंतर तोही चिकटला मात्र सुदैवाने चेतन फेकला गेल्याने बचावला ता गौरव हा गंभीररीत्या जखमी झाल्याने आईने आक्रोश केल्याने नजीकचे शेतकरी धावून आले. त्यांनी दोघा भावडांना तत्काळ कुर्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मलकापूर येथे हलवले असता गौरवला मृत घोषित करण्यात आले. शनिवारीच गौरववर पारंबी येथे सांयकाळी अंत्यत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
