चोरटे शहरात मुक्कामी : भुसावळातील म्हाडा कॉलनीतून दुचाकी लांबवली
भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून म्हाडा कॉलनीतून 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
राहुल संतोष नकवाल (26, म्हाडा कॉलनी, रामकृष्ण नगर, गजानन महाराज मंदिराजवळ, भुसावळ) हे नोकरदार असून त्यांच्याकडे कामावर जाण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 डी.यु.4039) आहे. नकवाल यांनी 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी घराबाहेर लावली असता चोरट्यांनी 1 जुलैच्या पहाटे संधी साधून दुचाकी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.
