डोंगरकठोर्‍यात शेतात काम करणार्‍या 64 वर्षीय वृध्द महिलेला सर्पदंश


A 64-year-old woman working in a farm in Dongarkathora was bitten by a snake यावल : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शेत-शिवारात शेतात काम करणार्‍या 64 वर्षीय वृध्द महिलेला सर्पदंश झाल्याची घटना घडली. महिला निंदणी करत असतांना तिच्या डाव्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

महिलेची प्रकृती स्थिर
डोंगरकठोरा येथील संध्याबाई तुळशीराम भिरूड (64) या गावालगत असलेल्या शेतामध्ये निंदनीचे काम करीत असताना त्यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार शेतकर्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहिनी भुगवाड्या, अधिपरीचारीका नेपाली भोळे, पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर उपचार केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !