राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर अजितदादा पवारांची वर्णी : कुर्‍हा येथे भाजपाचा जल्लोष


मुक्ताईनगर : अजित पवारांनी नऊ सहकार्‍यांनी घेत शिंदे-भाजपा सरकारला समर्थन दिल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली तर अन्य राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर कुर्‍हाकाकोडा येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्याानी कुर्‍हा येथे पेढे वाटप केले तसेच फटाके फोडले.

यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, रसाल पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, चंद्रकांत बोराखेडे,, भाजपा शहराध्यक्ष रवींद्र राजपूत, अजीजखान, प्रवीण शिंपी, अजगर खान पठाण, संतोष उगले, प्रवीण भोंबे, मधुकर अण्णा पाटील, देविदास दांडगे, प्रभाकर सुशीर, नंदू खिरळकर, दळपत भोई, रामभाऊ भवरे, सोपान झाल्टे, गोलू कांडेलकर, दीपक वाघ, कल्पेश राठोड, प्रदीप गोधली, राजू मिस्तरी, अमोल खिरळकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील विकासकामांना आता अधिक वेग येईल, असे अशोक कांडेलकर म्हणाले.

कुर्‍हा येथे फटाके फोडून जल्लोष
अजित पवार यांनी शिवसेना व भारतीय जनता पार्टी सोबत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुर्‍हा येथील अजित पवार समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून जल्लोष केला. रसाल पवार, रणजीत गोयंका, अनंत पाटील, विनोद पाटील, भैया कांडेलकर, अविनाश वाढे, राहुल खिरलकर, मंगेश पाटील, दीपक वाघ, ज्ञानेश्वर तायडे, पंकज (मुन्ना) धाबे, रीतेश मुळतकर आदी शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !