सावद्यातील मटण विक्रेत्या तरुणावर सुरीने हल्ला करीत धूम स्टाईल मोबाईल लांबवला
Suri assaulted a young mutton seller in Sawda and pulled out a dhoom style mobile phone सावदा : थोरगव्हाण येथून सावदा शहराकडे दुचाकीने येत असलेल्या सावदा येथील मटण विक्री करणार्या तरुणावर अज्ञात दोघांनी सुरीने हल्ला चढवून पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने लांबवल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता थोरगव्हाण गावाच्या शिवारात घडली. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा कसून शोध सुरू
अर्षद बाशीद खाटीक (34, सावदा) हा तरुण मटण विक्री करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी रात्री पावणेआठ वाजता हा तरुण थोरगव्हाण येथून सावदा शहराकडे येत असताना थोरगव्हाण शिवारातील सावदा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांपैकी दुचाकीस्वारामागे बसलेल्या एकाने अर्षदच्या पाठीवर लोखंडी सुरीने वार करीत रोकडची मागणी केली व रोकड न मिळाल्याने तरुणाकडे पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकारानंतर तरुणाने भेदरलेल्या अवस्थेत सावदा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.
