भूसंपादीत मिळकतीत खोटे शपथपत्र देत फसवणूक : भुसावळातील एकाविरोधात गुन्हा
Fraud by making false affidavit of income in land acquisition : Offense against one in Bhusawal
यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथे शेत मिळकतीत हिस्सा असतांना देखील खोटे शपथपत्र सादर करून भूसंपादनाचा मोबदला लाटून महिलेची दहा लाख 65 हजार रुपयात फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यावल न्यायालयाच्या आदेशान्वये यावल पोलिसात भुसावळातील एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 2016 मध्ये घडली.
असे आहे नेमके प्रकरण
अंजाळे, ता.यावल येथील अनिल भास्कर सपकाळे यांनी यावल न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बाळू महारु सपकाळे (रा.अंजाळे, हल्ली मुक्काम कंडारी, ता.भुसावळ) यांनी फिर्यादी यांच्या आईचा शेत मिळकतीत हिस्सा असतांनादेखील कायद्याने हा हिस्सा डावलण्याच्या उद्देशाने प्रांत अधिकारी यांच्या समक्ष खोटे शपथपत्र दाखल केले आणि भूसंपादनाची मिळालेली दहा लाख 65 हजार 565 रुपयाची रक्कम एकट्याने ठेवून घेतली व फसवणूक केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम तळेले करीत आहे.
