सातोद येथे शेतात काम करतांना महिलेला सर्पदंश
Woman bitten by snake while working in field at Satod यावल : यावल तालुक्यातील सातोद येथे शेतात निंदणी करीत असलेल्या 60 वर्षीय वृद्ध महिलेला सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच महिलेस यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सतत तीन दिवसात सर्पदंशची ही तिसरी घटना आहे.
शेतात काम करताना सर्पदंश
सातोद, ता. यावल येथील शेत शिवारात शानुबाई भालेराव (60) या वयोवृद्धा निंदणी करीत असताना त्यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच वयोवृद्धेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहिनी भुगवाड्या, अधिपरीचारीका माधुरी ठोके, सुमन राऊत, पिंटू बागुल आदींनी उपचार केले. यापूर्वी डोंगरकठोरा, कोरपावली येथे निंदणी करताना महिलेला सर्पदंश झाला.
