नाडगाव येथील 35 वर्षीय विवाहितेची आत्महत्या


बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथील शाहू नगरातील रहिवासी असलेल्या आशा रवींद्र वाघ (35) या विवाहितेने स्वयंपाकगृहात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पंख्याला दोर लावून आत्महत्या
हता यांनी घरातील किचनमधील पंख्याला दोर लावून गळफास घेतला. मयत विवाहितेच्या पश्चात पती व दोन मुली असा परिवार आहे. बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नाडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यंसस्कार करण्यात आले. तपास हवालदार अयूब तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !