रावेर बसस्थानकावर बोलण्यात गुंतवून कर्जोदच्या महिलेचे 18 हजारांची सोन्याची पोत लांबवली


18,000 gold texture of a woman of Karjod by engaging in talking at Raver bus stand रावेर : बोलण्यात गुंतवून भामट्या महिलेने कर्जोद येथील महिलेकडून एक हजारांची रोकड व 18 हजारांची पोत लांबवल्याची घटना रावेर बसस्थानकात मंगळवारी दुपारी 12.30 वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोलण्यात गुंतवत लांबवली पोत
कलाबाई केशव महाजन (65, कर्जोद, ता.रावेर) या पती केशव महाजन यांच्यासह मंगळवारी बसस्थानकात बसची प्रतीक्षा करीत असतना 30 ते 35 वर्षीय मराठी भाषा बोलणार्‍या महिलेने दाम्पत्याशी संवाद साधत त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख व 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याची पोत पाहण्यासाठी घेतली व काही वेळात पैसे व पोत आणून देते म्हणून भामट्या महिलेने पोबारा केला. काही वेळानंतर दाम्पत्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रावेर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !