कॉल करण्यासाठी मोबाईल घेत भामट्याने मोबाईलच लांबवला : यावल शहरातील प्रकार


Taking the mobile to make a call, Bhamtya extended the mobile: type in Yaval city यावल : शहरातील फैजपूर रस्त्यावरील गणपती नगराजवळ एका शोरूम समोर उभ्या असलेल्या तरुणांकडून कॉल करण्यासाठी एकाने मोबाईल मागितला आणि नंतर तो मोबाईल घेऊन पसार झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
यावल शहरात फैजपूर रस्त्यावर गणपती नगर असून या गणपती नगरासमोरील एका दुचाकीच्या शोरूममध्ये देवानंद नरेश लोहार (इंदिरानगर, सातोद, ता.यावल) हा आला असता त्याच्याकडे एक अज्ञात व्यक्ती आला आणि मला एक कॉल करायचा आहे. तुझा मोबाईल दे, असे सांगून त्याने मोबाईल मागितला व मोबाईलवर बोलणे करून मोबाईल घेऊनच त्याने पळ काढला. हा प्रकार निदर्शनास येताच तरुणाने यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !