मुक्ताईनगरात महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


Molestation: of woman in Muktainagar : Crime against one मुक्ताईनगर : शहरातील एका भागातील 25 वर्षीय महिलेचा विनयभंग करीत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.

महिलेवर अतिप्रसंग
25 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार संशयित सुनील उर्फ सुदाम वाघ (निमखेडी, ता.मुक्ताईनगर) याने महिलेच्या घरात शिरून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !