भुसावळात पालिकेचे झोनल अधिकारी प्रत्येक प्रभागात जावून मूलभूत समस्या सोडवणार


In Bhusawal, the zonal officers of the municipality will go to each ward and solve the basic problems भुसावळ  : शहरात सर्वाधिक समस्या रस्ते, पाणी व गटारींबाबत येत असल्याने नागरीक दिवसभर निवेदन देण्यासाठी गर्दी करीत असल्याने नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी 24 प्रभागांसाठी झोनल अधिकार्‍यांची नियुक्ती करीत त्यांचे क्रमांक जाहीर केले आहेत.

प्रभागात येवून अधिकारी सोडवणार समस्या
संबंधित झोनल अधिकारी त्या सोपवलेल्या प्रभागात जावून आता मूलभूत सुविधा सोडवणार असून त्याबाबत दररोजचा अहवाल उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांना सादर करणार आहेत. झोनल अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे आता नागरीकांना आपल्या प्रभागातच संबंधित अधिकार्‍यांकडे समस्या मांडता येणार असून त्या माध्यमातून समस्या निकालाही काढता येणार आहेत.

असे आहेत नियुक्त झोनल अधिकारी
प्रभाग एक व दोन- आरोग्य अधिकारी प्रदीप देविदास पवार, प्रभाग तीन व चार- स्वच्छता निरीक्षक वसंत चेनसिंग राठोड, प्रभाग पाच व सहा- नगर अभियंता- रीतेश भाऊसाहेब बच्छाव, प्रभाग सात व आठ- आस्थापना प्रमुख वैभव सुरेश पवार, प्रभाग नऊ व दहा- अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे, प्रभाग 11 व 21- पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख, प्रभाग 12 व 13- विजय शिवनारायण तोष्णीवाल, प्रभाग 14- सीएलटीसी वैभव सज्जनसिंग पाटील, प्रभाग 15- सीएलटीसी स्वप्नील जयसिंग वाघ, प्रभाग 16- सीएलटीसी धीरज भास्कर बाणाईत, प्रभाग 17- पाणीपुरवठा अभियंता नितीन विलासराव लुंगे, प्रभाग 18- संगणक अभियंता अनिल दत्तात्रय गवारे, प्रभाग 19 व 20- आरेखक महेश विठ्ठल चौधरी, प्रभाग 22- सीएलटीसी धीरज भास्कर बाणाईत व प्रभाग 23 व 24- काार्यालय अधीक्षक परवेज अहमद सगीर अहमद


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !