भरधाव बोलेरोने दुचाकीला उडवले : भोर गावातील तिघे जखमी


Speeding bolero blows up two-wheeler : Three injured in Bhor village रावेर  : भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत भोर, ता.रावेर येथील तिघे जखमी झाले. हा अपघात बुधवार, 5 जुलै रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता घडला. या प्रकरणी बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघे जखमी, दुचाकीचे नुकसान
शेख सलमान शेख शब्बीर (25, भोर, ता.रावेर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे वडिल शेख शब्बीर शेख हसन, रवी हरचंद जाधव व राजू रामदास भालेराव (भोर स्टेशन) हे दुचाकी (एम.एच.19 ईसी 2657) ने जात असताना भरधाव बोलेरो (एम.एच.19 सी.वाय.6583) वरील चालक जितेंद्र पांडुरंग कोळी (खिर्डी, ता.रावेर) भरधाव वेगात धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जखमी होवून दुचाकीचेही नुकसान झाले. हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !