हतनूर धरणात 36 दिवसात 690.2 मि.मि पावसाची नोंद


खिर्डी : अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवणार्‍या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 188.2 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. पावसाळ्याचा एक महिना ओलांडल्यावरही हतनूर धरणाच्या जलसाठ्यात पाहिजे तेव्हढी वाढ होऊ शकली नाही.

690 एम.एम.पाऊस
पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार 1 जूनपासून पावसाचे पाणी मोजण्यास सुरुवात होते. हतनूर धरणाच्या जलसाठ्यात 1 जून ते 6 जुलै अशा एकूण 36 दिवसात धरणाच्या कॅचमेंट परीसरात केवळ 690.2 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. 5 जुलै रोजी सायंकाळपासून 6 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 188.2 मि.मि तर आतापर्यंत 80 मि.मी. पाऊस नोंद झाली आहे. या आधी 35 दिवसांत 419.8 मि.मी. पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाळ्यात धरणावर कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होवू नये यासाठी धरणावरील महत्त्वाची कामे करण्यात आली आहेत. धरणाच्या पाणीपातळीकडे शाखा अभियंता शशिकांत गंभीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणावरील कर्मचारी बळीराम कोळी व अन्य कर्मचारी हे लक्ष ठेवून आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !