भुसावळात गावठी पिस्टलासह दोघे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
In Bhusawal, two villagers with a pistol in the market police net भुसावळ : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या दोघांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने गावठी कट्टा खरेदी-विक्री करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेख दानिश शेख नासीर (28, आझाद नगर, भुसावळ) व प्रफुल्ल आनंदा पाटील (29, आकाश फार्मजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील पाटीलमळा भागात संशयित शेख दानिश शेख नासीर हा पिस्टल बाळगून असल्याची मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले तर अंगझडतीत त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले. संशयिताने हे पिस्टल प्रफुल्ल पाटील याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी कर्मचारी उमाकांत पाटील, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सागर वंजारी
रमण सुरळकर आदींच्या पथकाने केली. सचिन रमेश पोळ यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
