भुसावळात एक लाखांचे दिड टन स्टील चोरी : एकाविरोधात गुन्हा


भुसावळ : रेल्वेच्या लोको शेडबाहेरून एक लाख रुपये किंमतीचे तब्बल पंधराशे किलो (दिड टन) स्टील चोरी करण्यात आल्याची बाब शहरातील रेल्वेच्या लोको शेडजवळ उघडकीस आली असून संशयित पवित्र राम शर्मा (कंडारी, ता.भुसावळ) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
सुपरवायझर दीपक भांडारे (38, कंडारी, ता.भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित पवित्र शर्मा हा त्यांच्या एचवायटी सॅमइंडिया (जीवी) दिल्ली कंपनीत कामाला होता मात्र रविवार, 2 रोजी सायंकाळी सात वाजता संशयिताने एक लाख रुपये किंमतीचे दिड टन स्टील चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !