भुसावळातील विवाहितेचा 50 लाख रुपये न आणल्याने छळ : पतीसह पाच संशयितांविरोधात गुन्हा
Harassment of married woman in Bhusawal for not bringing Rs 50 lakh: Case against five suspects including husband भुसावळ : भुसावळातील माहेर व बडोदा गुजरात येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून 50 लाख रुपये न आणल्याने तिचा पतीसह सासरच्यांनी छळ केला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
29 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तथा पतीसह अन्य चौघांनी माहेरून 50 लाख रुपये आणावेत म्हणून सातत्याने शारीरीक व मानसिक छळ केला. या प्रकरणी विवाहितेने दक्षता समितीकडे तक्रार केल्यानंतर पहिल्या तारखेला संबंधित आले नाहीत मात्र दुसर्या तारखेला संबंधित आल्यानंतर त्यांनी विवाहितेशी भांडण केले व त्यानंतर पुन्हा तारीख दिल्यानंतरही संबंधित न आल्याने महिला दक्षता समितीने पत्र दिल्यानंतर शहर पोलिसात या प्रकरणी संशयित पती प्रशांत बन्सीलाल पाटील, सासू सुशीलाबाई बन्सीलाल पाटील, सासरे बन्सीलाल नारायण पाटील (तिघे रा.102, गंगोत्री ग्रीन्स, बन्सल मॉलमागे, बडोदा, गुजरात), नणंद प्रतिभा निलेश पाटील व निलेश निलेश प्रताप पाटील (वाकड, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद नेवे करीत आहेत.
