गुरांची अवैध वाहतूक : भुसावळ तालुका पोलिसांनी केली नऊ गुरांची सुटका
Illegal movement of cattle : Bhusawal taluka police rescued nine cattle भुसावळ : कत्तलीच्या उद्देशाने गुरांची विना परवाना वाहतूक करताना तालुका पोलिसांनी कारवाई करीत एक लाख पाच हजार रुपये किंमतीच्या नऊ गुरांची सुटका केली. ही कारवाई भुसावळ-मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 वरील जुना फेकरी टोल नाक्यावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली.
कारवाईने उडाली खळबळ
सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी शेख साजीद शेख रफिक कुरेशी (प्रतिभा नगर, वरणगाव) व शेख आबीद शेख कुरेशी (प्रतिभा नगर, वरणगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. भुसावळ तालुका पोलीस गस्तीवर असताना जुना फेकरी टोल नाक्यावर वाहन (क्रमांक एम.एच.14 ए.झेड.1665) आल्यानंतर तपासणी केली असता नऊ गुरांची अत्यंत निर्दयतेने व दाटीवाटीने वाहतूक होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघा संशयितांसह वाहन मिळून दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर नऊ गुरांची गो शाळेत रवानगी केली. तपास पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.
