नाशिक येथील मैत्री फाउंडेशनचा 96 गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात
जिल्हा परीषद शाळा शिंदी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिंदी येथे नाशिक येथील मैत्री फाउंडेशनच्या वतीने 96 गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच कैलास पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कांचन परदेशी, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती बन्सीलाल पाटील, मैत्री फाउंडेशन नाशिकचे पदाधिकारी खजिनदार लीना पाचपांडे, मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हेडाऊ, संस्थेचे सभासद तथा एसआयडी ऑफिसर अनिल इंगळे, महेश राऊळ, प्रा.रवींद्र पाटील, किरण महाजन, शेखर चौधरी, रवींद्र धांडे, महेश पवार, विलास बार्हे उपस्थित होते.
शिक्षकांच्या संस्कारामुळे आजवरची मजल
आम्ही सर्वांनी जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेतलेले आहे. शिक्षकांच्या संस्कारामुळेच आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत, असे मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हेडाऊ म्हणाले. विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन आदर्श नागरीक व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिंदी या शाळेतील एकूण 96 विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची 68 राजा पाटी, 68 सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक, 96 पेन्सिल, 96 पेन,96 पट्टी, 96 एकेरी वही, 96 दुरेघी वही, 96 चौरेघी वहि, 96 चौकटी वहि याप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, मैत्री फाउंडेशन या संस्थेला आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार अध्यक्ष महिला राज्य आयोग महाराष्ट्र राज्य रुपाली चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याची माहिती समाधान जाधव यांनी दिली. सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी तर प्रास्ताविक उपशिक्षिका मीनाक्षी पाटील व आभार मुख्याध्यापक भगवान बडगुजर यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपशिक्षिका प्रीती फेगडे, शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीस प्रमिला पाटील, देवका परदेशी यांनी परीश्रम घेतले.
