कोरपावलीतील वयोवृद्धाची विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या


Elderly in Korpavali committed suicide by drinking poisonous liquid यावल : तालुक्यातील कोरपावली येथील एका 65 वर्षीय वयोवृद्धाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. विजय रामदास फेगडे (65) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विषारी द्रव सेवन करीत आत्महत्या
कोरपावली गावातील रहिवासी विजय रामदास फेगडे यांनी आपल्या घरी विषारी पदार्थ सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात डॉ.सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !