भुसावळातील मुस्लीम कॉलनीत भरदिवसा वकिलाकडे घरफोडी : सात हजारांचा ऐवज लंपास


Lawyer’s house burglarized in broad daylight in Muslim Colony in Bhusawal: 7000 instead of Rs.
भुसावळ :
शहरातील खडका रोड भागातील मुस्लीम कॉलनीत बंद घरातून चोरट्यांनी सात हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. भर दिवसा झालेल्या घरफोडीमुळे या भागात खळबळ उडाली आहे.

भरदिवसा घरफोडीने परीसरात खळबळ
शेख रीझवान शेख लाल (25, मुस्लिम कॉलनी, भुसावळ) हे व्यवसायाने वकील आहेत. मुस्लीम कॉलनीतील ईनामुल मशिदीसमोर ते वास्तव्यास असून रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सात हजार रुपये किंमतीच्या पाच चांदीच्या अंगठ्या लांबवल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेख रीझवान यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !