यावल शहरात मनसेच्या वतीने एक सही संतापाची स्वाक्षरी मोहीम
A signature outrage signature campaign on behalf of MNS in Yaval town यावल : शहरातील भुसावळ टी पॉइंटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये पक्षांतर्गत पडणारी फूट व सत्तेसाठी राजकीय पदाधिकार्यांच्या कोलांट उड्या याला कंटाळून व त्यांच्यावर संताप व्यक्त करणारी ही स्वाक्षरी मोहीम घेतली जात आहे.
स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावल शहरात या स्वाक्षरी मोहिमेला नागरीकांनी मोठ्या संख्येत प्रतिसाद देत संतापाच्या स्वाक्षर्या केल्या.
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय पक्षांमध्ये फूट पडणे, सत्तेसाठी राजकीय पदाधिकार्यांची सत्ताधारी गटात नितीमूल्य बाजूला ठेवत प्रवेश करणे हे प्रकार सुरू आहे. या प्रकाराच्या विरोधात मनसेच्या वतीने यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट येथे एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. मतदार ज्या राजकीय पक्षावर विश्वास ठेवून मतदार मतदान करतो ते राजकीय पक्षाचे पुढारी सत्तेच्या लाचारीमुळे पक्षातून बाहेर पडून गलिच्छ प्रकारचे राजकारण करीत आहेत, असे आता दिसून आले आहे. राज्याच्या राजकारणात या कोलांट उड्या सुरू आहेत. या संपूर्ण प्रकाराचा संताप स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून जनतेने व्यक्त करावा म्हणून एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहीम यावल शहरातील भुसावळ टी-पाईंटवर राबवण्यात आली.

स्वाक्षरीतून शेकडो नागरीकांचा संताप बाहेर
सकाळपासून राबवण्यात आलेल्या मोहिमेत शेकडो नागरीकांनी स्वाक्षरी करून आपला संताप व्यक्त केला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, उपजिल्हाध्यक्ष अजय तायडे, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, शहराध्यक्ष गौरव कोळी, शुभम बोरसे, हेमचंद्र चौधरी सह आदींनी परिश्रम घेतले दिवसभर या मोहिमेत शकडो नागरीकांनी येवून आपला संताप व्यक्त करीत स्वाक्षरी केली.
