मुक्ताईनगरात संजय गांधी निराधार योजनेच्या 900 प्रलंबित प्रकरणांना मंजुरी

अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या प्रयत्नांना आले यश


मुक्ताईनगर : संजय गांधी निराधार योजनेची तब्बल एक हजार 200 प्रकरणी तहसील कार्यालयात प्रलंबित होती. या संदर्भात तक्रारी वाढल्यानंतर अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी पाठपुरावा केल्यानंतर ही प्रकरणे निकाली निघाली आहेत.

लाभार्थींना मिळाला मोठा दिलासा
मुक्ताईनगर तहसील अंतर्गत सन 2023 मधील या योजनांची पात्र प्रकरणे मंजूर करून निकाली काढण्यात आली मात्र 2022 ते 2023 या वर्षात लाभार्थींनी तहसील कार्यालयाकडे सादर केलेली एक हजार 200 प्रकरण तहसील कार्यालयाकडे मंजुरीअभावी पडून होती. लाभार्थींना प्रकरण नामंजूर किवा त्रृटी निघाली याबाबत कोणतीच माहिती दिली जात नव्हती. प्रकरण निकाली न काढल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. ही बाब लाभार्थींनी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना कळवल्यानंतर त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी 6 जून रोजी मुक्ताईनगर तहसीलदार यांना हे सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याविषयी निवेदनाद्वारे विनंती केली. दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

आमदार खडसेंनी केला पाठपुरावा
विधानपरीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सुद्धा तहसील कार्यालयात भुसावळ प्रांताधिकारी, मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत या योजनांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याच सूचना केल्या होत्या. सतत्याच्या पाठपुराव्यानंतर प्रलंबित एक हजार 200 पैकी 899 प्रकरणांना मंजुरी मिळाली असून त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन
प्रकरण मंजूर झालेल्या लाभार्थींनी बँक पासबुकची तसेच आधार कार्डची झेरॉक्स प्रत, दोन पासपोर्ट फोटो व मोबाईल नंबरसह तहसील कार्यालयात जमा करावे, काही अडचण आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय किंवा पदाधिकार्‍यांसोबत संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी केले आहे. प्रलंबित प्रकरणाना मंजुरी मिळाल्याबद्दल लाभार्थींनी आमदार एकनाथराव खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !