कोळवद शेत शिवारात विद्युत शॉक लागून बैलजोडी गतप्राण


यावल : तालुक्यातील कोळवद येथील शेत शिवारात पेरणी आटोपून बैल गाडीव्दारे शेतकरी व शेतमजुरी घरी परतत असतांना विद्युत खांबाच्या ताणासाठी लावलेल्या ताराला स्पर्श होवून बैलजोडी जागीच गतप्राण झाली तर सुदैवाने बैलगाडीतील शेतकरी व शेतमजुर असे सात जण बालबाल बचावले. ताणासाठी असलेल्या तारात विद्युत प्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत शेतकर्‍याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यावर हंगामात कोसळले संकट
कोळवद, ता.यावल येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी हे मंगळवारी सकाळी शेतात मजूर घेऊन बैलगाडीवर शेती काम व पेरणी करण्यासाठी गेले असता दुपारी काम आटोपल्यावर ते व सहा मजुर असे सात जण बैल गाडीव्दारे शेतातून घरी परतत असताना शेतातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलच्या स्टे अर्थात तणावच्या ताराला बैलाचा स्पर्श झाला व बैल जोडीला जबर विद्युत शॉक लागला व त्यात जागेवरचं बैलजोडी गतप्राण झाली. दरम्यान बैलगाडीवर बसलेले शेतकरी व शेतमजुर असे सात जण मात्र बालंबाल बचावले. घटने नंतर विद्युत वितरण कंपनीला माहिती देण्यात आली. या दुर्घटनेत बैलजोडी विजेचा शॉकमुळे गतप्राण झाल्याने शेतकरी सुनील चौधरी यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !