भुसावळात कर्तव्याशी प्रामाणिक राहून सेवा देणार्‍या खाकीतील शिलेदारांचा सन्मान

पोलीस उपअधीक्षकांकडून कौतुकाची थाप : पोलीस अधीक्षकांकडूनही रीवॉर्ड


भुसावळ  :खाकीतील कर्तव्याशी प्रामाणिक राहून दिलेल्या वेळेत आपले काम जवाबदारीने पूर्ण करणार्‍या पाच शिलेदारांचा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी मंगळवारी सहृदय सन्मान केला. ‘नूतन उपअधीक्षक पोलीस स्टेशन एम्प्लाई ऑफ द मंथ’ ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार दर महिन्याला उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकांकडून या कर्मचार्‍यांना प्रत्येक एक हजार रुपये रीवॉर्डही दिला जाणार असून मानकर्‍यांचा एकत्रीत फोटो डीवायएसपी कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात येणार आहे. कर्मचार्‍यांमध्ये कामाप्रती आता अधिक हुरूप वाढला आहे.

पोलीस उपअधीक्षकांकडून कर्मचार्‍यांचे कौतुक
मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांनी पाचही कर्मचार्‍यांचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारल्याने कर्मचार्‍यांचा कामाप्रतीचा उत्साह दुणावला असून अन्य कर्मचारीदेखील या कामाची प्रेरणा घेवून आता शासकीय काम जलदगतीने करतील, अशी आशा नूतन उपअधीक्षक पिंगळे यांनी व्यक्त केली.






या कर्मचार्‍यांचा सन्मान
भुसावळ शहर, बाजारपेठ व नशिराबाद पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस प्रणालीत शंभर टक्के फिडींग करणार्‍या अनुक्रमे कॉन्स्टेबल विशाल लाड, नाईक दिनेश सुरेश कापडणे, महिला नाईक मोनाली दहिभाते तसेच वॉरंट बजावणी व गुन्ह्यांची निर्गती करणार्‍या भुसावळ तालुक्याचे नाईक दीपक अशोक जाधव तसेच पेडींग केसेसमधील दंड वसुलीसाठी वाहन चालकांच्या पत्त्यावर दंडात्मक नोटीसा बजावून दंड वसुली तसेच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करणारे शहर वाहतूक शाखेचे भाऊसाहेब अशोक पाटील यांचा पोलीस उपअधीक्षक कार्यालयात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तालुक्याचे प्रभारी सतीश कुलकर्णी, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे गजानन पडघण, नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, दुय्यम अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !