मोहराळ्यात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना : अज्ञाताविरूध्द गुन्हा


यावल : यावल तालुक्यातील मोहराळा येथे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूघ्द गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर गावातील बसस्टॅन्ड चौकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
मोहराळा, ता.यावल येथे बस स्टॅण्ड चौकात महापुरूषांचा पुतळा असून तेथे दोन्ही बाजूने सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सोमवारी रात्री गावात वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा घेत अज्ञाताने पुतळ्याच्या दिशेने दोन दगड भिरकावल. यामुळे महापुरूषाच्या पुतळ्याला दोन ठिकाणी खड्डे पडले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संतप्त समाजबांधवांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले व अनिल केशव अडकमोल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील बसस्टॅण्ड चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मोहराळा येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !