भुसावळ शहरातील महिलेची 50 हजारांची रोकड लांबवली
भुसावळ : बँकेत मुलासह आलेल्या महिलेच्या पर्समधून भामट्यांनी 50 हजारांची रोकड लांबवल्याची घटना शहरातील पंजाब नॅशनल बँक ते श्रीराम फायनान्सदरम्यान सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. भर दिवसा झालेल्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध
मंजुलाबाई सुदाम इंगोले (54, भुसावळ) या गृहिणी असून सोमवार, 10 रोजी दुपारी साडेतीन वाजता मुलासह बँकेत आल्या होत्या मात्र पंजाब नॅशनल बँक ते श्रीराम फायनान्स दरम्यान घडली. महिलेचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. बाजारपेठ पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही तसेच बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक शशिकांत महाले करीत आहेत.
