मांडवादिगर फाट्याजवळ अपघात : मालवाहू टेम्पोच्या धडकेने बर्हाणपूरचा दुचाकीस्वार जखमी
Accident near Mandwadigar fork : Bike rider from Barhanpur injured after being hit by cargo tempo भुसावळ : मालवाहतूक करणार्या भरधाव टेम्पोने धडक दिल्याने बर्हाणपूर येथील दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कुर्हा-जामनेर रस्त्यावरील मांडवादिगर फाट्याजवळ 27 जून रोजी दुपारी दिड वाजता घडली होती. या प्रकरणी मालवाहतूक करणार्या वाहनावरील चालक राजेंद्र प्रकाश सोनवणे (अकलूद, ता.यावल) याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
टेम्पो पोलिसांकडून जप्त
भुसावळ तालुका पोलिसांनी अपघाताला कारणीभूत असलेला टेम्पो जप्त केला आहे. मनोज भावलाल दात्रे (32, शिकारपूर, पाण्याच्या टाकीजवळ, बर्हाणपूर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या दुचाकीला भरधाव टेम्पो (एम.एच.13 सी.यु.4914) वरील चालक राजेंद्र प्रकाश सोनवणे (अकलूद, ता.यावल) याने भरधाव वेगाने धडक दिल्याने दात्रे हे जखमी झाले होते तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी दात्रे यांनी बुधवारी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस मुसा शेख करीत आहेत.
