एसटी प्रवासात यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; कुटूंबातील सदस्यांनाही मारहाण
A minor girl from Yaval taluka was molested during ST travel ; Family members were also beaten
यावल : तालुक्यातील साकळी ते शिरागड दरम्यान एस.टी.बसमध्ये प्रवास करतांना एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केला. पीडीतेच्या कुटुंबीयाने मुलाच्या कुटुंबास विचारणा केली असता मुलाच्या कुटुंबातील चौघांनी पीडित व तिच्या आई-वडील आणि भावांना मारहाण केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मारहाण तसेच विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
बस प्रवासात विनयभंग
साकळी ते शिरागड या दरम्यान एस.टी.बसमध्ये पथराडे येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी प्रवास करीत असताना एका तरुणाने विनयभंग केला. मुलीने आपल्या कुटुंबाला माहिती दिली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी सदर तरुणाच्या कुटुंबाला जाब विचारला. याचा राग येऊन आदित्य ज्ञानेश्वर सोळंके, तुषार सूर्यभान सोळुंके, प्रशांत कैलास सोळुंके व सूर्यभान आधार सोळुंके (सर्व राहणार शिरागड) या चौघांनी पीडित मुलगी, तिचे आई-वडील आणि तिच्या भावाला मारहाण केली. तिच्या वहिनीला देखील शिवीगाळ केली. याप्रकरणी चार जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मारहाण करण्यासह विनयभंग, सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.
