Solving the underlying problem in Bhusawal is urgent भुसावळातील मूलभूत समस्या तातडीने सोडवा
भुसावळ पालिकेत आमदारांची आढावा बैठक : विजेचा अपव्यय थांबवण्यासह रस्त्यांच्या दुर्दशेबाबत वेधले लक्ष
Solving the underlying problem in Bhusawal is urgent भुसावळ : रस्ते, पाणी, गटारी व वीज आदी मूलभूत सुविधा पुरवणे ही पालिकेची जवाबदारी असतानाही अनेक समस्या सुटत नसल्याने नागरीक तक्रारी करीत आहेत. रस्त्यांवर चालणे कठीण झाले असताना पॅचवर्कची कामे आमदाराला करावी लागत असताना आता पालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार संजय सावकारे यांनी आढावा बैठकीत केल्या. यावेळी त्यांनी शहरातील रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे तातडीने करण्यासह अनेक भागात 24 तास सुरू असलेल्या पथदिव्यांबाबत वेळीच दखल घेवून राष्ट्रीय संपत्तीचा होणारा र्हास थांबवण्याची अपेक्षाही व्यक्त केली. भुसावळ शहरातील विविध समस्यांच्या प्रश्नी शुक्रवारी आमदार संजय सावकारे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे व विभाग प्रमुखांसोबत शुक्रवारी दुपारी आढावा बैठक घेतली. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणार्या यंत्रणेवरील 12 एमएलडीच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पास त्यांनी भेट देवून पाहणी केली.
आढावा बैठकीत समस्या सुटण्याची सूचना
शहरातील अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरीकांना पायी चालणे कठीण झाले आहे तर अनेक भागात 24 तास पथदिवे सुरू असल्याने राष्ट्रीय संपत्तीचा र्हास होत आहे. शहरातील रस्त्यांबाबत आमदारांकडे नागरीक तक्रारी करीत असल्याने या अनुषंगाने आमदारांनी शुक्रवारी पालिकेत आढावा बैठक घेतली. शहरातील नाहाटा चौफुली जलकुंभ भरल्यानंतर गडकरी नगर जलकुंभ भरतो. यामुळे स्वतंंत्र जोडणी व बुस्टर पंप बसवून एकाचवेळी दोन्ही जलकुंभ भरले तर पाणीपुरवठ्याचे दोन ते तीन दिवस कमी होणार असल्याने याबाबत उपाययोजना करण्याची त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली. अमृत योजनेच्या दुसर्या टप्प्याला मंजूरी मिळत नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी याबाबत मंत्रालयात अधिकार्यांसोबत चर्चा केली असून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी महेश वाघमोडेंसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

स्वच्छतेबाबतही टोचले आमदारांनी कान
भुसावळ शहरातील शौचालयांची स्वच्छता होत नाही तसेच शहरातील रस्त्यांवरील कचरा, अस्वच्छतेचा प्रश्नी त्यांनी अधिकार्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. मुख्याधिकार्यांनी समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे बैठकीत सांगितले.
तापी काठावरील नागरीकांना सुविधा पुरवा
रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवल्यानंतर विस्थापीत झालेले नागरीक तापी काठावरील पार्कच्या आरक्षण असलेल्या जागेत सद्यस्थितीत वास्तव्यास असून त्यांना सेवा-सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना आमदारांनी बैठकीत केल्या. या जागेसाठी शासनाकडे प्रस्ताव दिला होता. आता शासनाने ही जागा पालिकेकडे जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून हस्तांतरीत होऊ शकेल, असे कळवले आहे. यामुळे या जागेच्या हस्तांतराबाबत प्रक्रिया करावी, असेही आमदार सावकारे म्हणाले.
