बोरखेडा सामूहिक हत्याकांड : वैद्यकीय अधिकार्यांचा नोंदविला जबाब
Borkheda Massacre : Recorded Statement of Medical Officers भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरणी शनिवारी वैद्यकीय अधिकारी यांचा जबाब नोंदवण्यात आला. विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांनी साक्ष नोंदविली. या खटल्याचे पुढील कामकाज हे 5 ऑगस्टला होईल. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे 15 ऑक्टोबर 2020 या दिवशी रात्री शेतात दोन मुले व दोन मुली अश्या चार बालकांची हत्या करण्यात आली होती तर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल असून हा खटला भुसावळत्ततील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे.
वैद्यकीय अधिकार्यांची नोंदवली साक्ष
शनिवारी येथील न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी वैद्यकीय अधिकारी एन.देवराज यांची साक्ष नोदविली. या खटल्याची पुढील सुनावली 5 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. या दिवशी पुणे येथील मोबाईल कंपनीचे दोन नोडल अधिकारी तसेच नाशिक प्रयोग शाळेतील वैद्यकीय तज्ज्ञ व घटनेच्या वेळी मृतदेहाचे फोटो काढणारे फोटोग्राफर यांची साक्ष नोंदवली जाईल. यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे साक्षीदारांची सरतपासणी घेतील. संशयीतातर्फे अॅड.सत्यनारायण पाल हे उलटतपासणी घेणार आहे.
शनिवारी न्यायालयात इन कॅमेरा साक्ष नोंद करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूचे वकील न्यायदालनात होते.
