निमगाव टेंभी शिवारातून शेताजवळ लावलेली मोटरसायकल लांबवली
A motorcycle parked near the farm was extended from Nimgaon Tembi Shivar यावल : तालुक्यातील निमगाव टेंभी गावाजवळ असलेल्या शेत गट क्रमांक 20 च्या समोर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरटे सक्रिय
निमगाव टेंभी गावाजवळ शेत गट क्रमांक 20 असून या शेताच्या बांधाला प्रकाश रामा बराटे (वांजोळा रोड, वाणी कॉलनी, लेवा प्रतिष्ठानसमोर, भुसावळ) यांनी आपली दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.डी.1693) लावली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून दुचाकी लांबवली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.
