केळी महामंडळाला स्व.हरीभाऊ जावळेंचे नाव देण्यासाठी प्रस्ताव देणार


Will propose to name Banana Corporation after Mr. Haribhau Jawale यावल : माजी खासदार कै.हरीभाऊ जावळे यांचा स्वप्न पूर्ण करीत राज्य सरकारने केळी महामंडळ स्थापन केले व त्यात 100 कोटींची तरतूद केली. आता या केळी महामंडळाची स्थापना झाली असून त्यास कै.हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्यात साठी कॅबीनेटमध्ये प्रस्ताव देवू, अशी घोषणा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावलमध्ये केली. यावल शहरातील विरार नगरात दोन कोटीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावल शहरातील विरार नगरात शनिवारी सायंकाळी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आले होते. त्यांच्या हस्ते शहरातील दोन कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

स्व.हरीभाऊ जावळेंचा स्वप्न पूर्ण
शहरातील श्री गजानन महाराज मंदिरातील कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आज स्व.हरीभाऊ जावळे यांचे केळी महामंडळाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने त्यावर शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे व त्या महामंडळाला स्वर्गीय हरिभाऊ जावळे केळी महामंडळ असे नाव द्यावे या करीता आम्ही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार आहोत. सव.जावळे यांचे सतत मार्गदर्शन आम्हाला मिळत होते व त्यांचे स्वप्न केळी बायोप्रॉडक्ट तसेच केळीला फळाचा दर्जा मिळावा यासाठी त्यांची तळमळ होती, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उपप्रमुख मुन्ना पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील, डॉ. कुंदन फेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, आर.डी.पाटील, भूषण फेगडे, चेतन पाटील, भरत चौधरी, पी.एस.सोनवणे, बाळू फेगडे, योगेश चौधरी, रीतेश बारी, शिवसैनिक व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

पाण्यामध्ये पक्ष बघू नये केंद्राची सूचना
केंद्र सरकारकडून वंचितांना पाणी मिळावे याकरीता मोठी तरतूद करण्यात आली आहे. यात संपूर्ण राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत काम करतांना पाण्यात पक्ष पाहू नये अशा केंद्राच्या सूचना आहे व निस्वार्थपणे सत्ताधारी असो की विरोधक सर्वांच्याच मतदारसंघात योजना राबवली जात आहे. राज्यात 37 हजार गावांना पाण्याच्या योजना मंजूर केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

खोका खोका करणार्‍या बोख्यांना विकासातून उत्तर
या कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री यांनी सांगितले की, आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणुू विरोधकांनी टिका केली मात्र आम्ही खोका खोका करणार्‍या बोख्यांना विकासातून उत्तर देत असल्याचे ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !