मोरगाव खुर्दच्या तरुणाची आत्महत्या


Suicide of Morgaon Khurd youth रावेर : रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील 24 वर्षीय तरुणाने निंभोरा सीम नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अक्षय जगन्नाथ महाजन (24, मोरगाव खुर्द, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे. अक्षय महाजन या तरुणाने निंभोरासीम येथील नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास नाईक अनिल साळुंखे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !