भुसावळातील प्रभाग 22 मधील समस्या सोडवण्याची पालिका प्रशासनाची ग्वाही
सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांच्या तक्रारीअंती पालिकेची दखल
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 22 मधील कस्तुरी नगरासह रघुकुल कॉलनी, सुरभी नगर, साधना नगर, शिव कॉलनी, देना नगर, सुरभी नगरच्या जवळून पाटील मळ्यातकडे जाणार्या रस्त्यासह अन्य या परीसरातील विविध समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारींची दखल घेत भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, नोडल ऑफिसर धीरज बाणाईत यांनी सोमवारी समस्यांची पाहणी केली. यावेळी तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले तसेच संबंधित विभागाच्या अधिकार्यांना जागेवरूनच सूचना देण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, विलास पाटील गोपाळ वाणी, सुधाकर पाटील, प्रमोद तळेले, लढे साहेब, संजय अग्रवाल, एकनाथ चौधरी, सुनंदा अंजाळेकर, मनीषा राणे, साधना चौधरी, परीसरातील नागरीक व महिला उपस्थित होत्या.

