हंबर्डी येथील सब स्टेशनमधील सुरक्षारक्षक बेपत्ता


Security guard missing from sub station in Humbardi  यावल : यावल तालुक्यातील हंबर्डी येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेला 34 वर्षीय सुरक्षा रक्षक अचानक बेपत्ता झाला आहे. हा सुरक्षारक्षक डांभूर्णी येथील रहिवासी असून तो घरी परतलाच नाही. फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.

पोलिसात हरवल्याची नोंद
हंबर्डी, ता.यावल येथे अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर विद्युत वितरण कंपनीचे सबस्टेशन असून तेथे भूषण हेमराज सावळे (34) हा तरुण सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. हा तरुण डांभूर्णी येथील रहिवासी असून तो गावातून कामाकरीता ये-जा करीत होता. दरम्यान तो कामावर गेला आणी नंतर घरी परत आलाच नाही. अचानक बेपत्ता झालेल्या या तरूणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला सर्वत्र शोध घेवून ही तरूण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तपास पोलीस नाईक महेंद्र महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !