डांभूर्णीतील विवाहिता चिमुकल्यासह यावल येथून बेपत्ता
डांभूर्णी : गावातील विवाहिता शुभांगी गिरीश साठे (27) या शनिवार, 15 रोजी आपल्या माहेरी सिंगत, ता.रावेर येथे जाण्यासाठी आठ वर्षीय चेतन साठेसह सकाळी दहा वाजता डांभूर्णीतील निघाल्या. किनगाव व तेथून त्या यावलपर्यंत त्या रीक्षाने गेल्या मात्र नंतर सिंगतपर्यंत जाणार होत्या मात्र त्या माहेरी पोहोचल्याच नाही.
यावल पोलिसांकडून कसून शोध
कुटूंबियांनी विवाहितेच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद असल्याने पोलीस ठाणे गाठण्यात आले. शुभांगी साठे हिचे पती गिरीश शालिक साठे व शुभांगी साठे यांचा लहान भाऊ जगदीश पाटील यांनी यावल पोलिसांना विवाहिता आठ वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. शुभांगी ही शरीराने सडपातळ असून तिचा वर्ण गोरा, अंगावर सोन्याचे दागिने आहेत. विवाहिता लहान मुलासह आढळल्यास 9011423140 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शुभांगी साठे यांच्या कुटुंबियांनी केले आहे. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.
