पिंप्रीनजीक उभ्या कारवर ट्रक धडकला : भुसावळातील एकाच परीवारातील आठ जण जखमी


Truck hits parked car near Pimprin: Eight persons from same family in Bhusawal injured भुसावळ : धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवर समोरून भरधाव वेगाने आलेला ट्रक आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील आठ सदस्य जखमी झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळातील कुटूंब अपघातात जखमी
निर्मला करुणेश गुप्ता (56, रा.प्लॉट नं.6, संभाजी नगर, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी याबाबत फिर्याद दिल्यानुसार, गुरुवार, 13 जुलै रोजी ते व त्यांचे नातेवाईक हे त्यांची कार (एम.एच.19 डी.व्ही.0809) ने भुसावळ येथून मीरा रोड (मुंबई)) येथे जात असताना दुपारी 4 ते 4.30 च्या दरम्यान पिंप्री ता. धरणगाव येथे त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभी असताना समोरुन भरधाव वेगाने आलेला ट्रक (एम. एच.04 ई.वाय. 9824) वरील चालकाने चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिल्याने या अपघातात कारमधील निर्मला गुप्ता, निखीलेश गुप्ता, रक्षा निखीलेश गुप्ता, अनिता शंकरलाल गुप्ता, शालिनी मंगेश गुप्ता, मंगेश गुप्ता, अंशिका गुप्ता, तरुण शंकरलाल गुप्ता आदींच्या डोक्यास, हातापायाला, तोंडाला मार बसला तसेच मुका मार लागून ते जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालक (नाव-गाव माहित नाहीत) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोती पवार हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !