चारीत्र्याच्या संशयावरून भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह तिघांविरोधात गुन्हा


Harassment of married woman in Bhusawal on suspicion of character: Crime against husband and three  भुसावळ : चारीत्र्याचा संशय घेवून तसेच महिला अपशकुनी आहे, असे मानुन तिचा पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केला. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरून निघून आल्या. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा
पूजा विकास आबनामे (27, वानवडी, पुणे, ह.मु.पांडुरंग टॉकीजजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, पती विकास कैलास आबनामे, सासू हेमा कैलास आबनामे व जेठ केदार कैलास आबनामे यांनी चारीत्र्यावर संशय घेत मारझोड करीत छळ केला तसेच विवाहिता अपशकुनी आहे, घराला शोभत नाही, जेवण बनवता येत नाही म्हणून तिचा छळ करण्यात आला. तीन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार सुमन राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !