कोळन्हावी फाट्याजवळ चारचाकीच्या धडकेने एक ठार ; दुसरा जखमी
One killed in four-wheeler collision near Kolnhavi Phata ; Another injured यावल : यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्यासमोर जळगाव ते यावल रस्त्यावरून एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल
यावल-जळगाव रस्त्यावर कोळन्हावी फाट्याजवळ चारचाकी कार (क्रमांक एम.एच.02 पी.ए.6330) घेवून चालक ज्ञानेश्वर श्रीराम जाधव (आव्हाणे, ता.जळगाव) हे जळगावकडे जात होते तर चुंचाळे, ता.यावल येथील रहिवासी अजय वासुदेव चौधरी व हर्षल अजय चौधरी हे पिता-पूत्रांच्या दुचाकीव्दारे जळगावकडून येत होते दरम्यान कोळन्हावी फाट्याजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अजय वासुदेव चौधरी व हर्षल चौधरी हे पिता पुत्र गंभीर जखमी झाले. यात उपचारादरम्यान अजय वासुदेव चौधरी यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी चारुदत्त वासुदेव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
