मार्च एप्रिल मे महिन्यात झालेल्या गारपीटीची भरपाई कधी देणार ? आमदार आमदार एकनाथराव खडसेंचा सवाल
When will the compensation for the hailstorm that happened in the month of March April May be paid? MLA MLA Eknathrao Khadse’s question मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पुर्ण नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने ही भरपाई केव्हा मिळणार? असा प्रश्न आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परीषदेत उपस्थित केला आहे.
पिकांची पूर्ण भरपाई कधी देणार ?
खडसे म्हणाले की, गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे केळी, मका व कांदा पिकांचे विशेषत: केळी पीकाचे अतोनात नुकसान झाले. एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री मुक्ताईनगरला येऊन सांगून गेले होते की, ताबडतोब नुकसान भरपाई देऊ मात्र अद्यापही पूर्ण पिकांची भरपाई देण्यात आलेली नाही. पंचनामे झालेल्यापैकी किती नुकसान भरपाई देणे बाकी आहे व ती कधी दिली जाणार आहे? असे खडसे म्हणाले.

तर मंत्रालयात लावणार बैठक
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, राज्यात मार्च, एप्रिल व मे 2023 मध्ये झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट, वादळी वार्यामुळे एकूण तीन लाख दोन हजार 706.07 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे 95 व्यक्तींचा आणि 946 जनावरांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्हयात झालेल्या नैसर्गिक आपत्ती आणि शेती पिकांच्या नुकसानभरपाईसाठी मार्च महिन्यात 2042.61 लक्ष, एप्रिल महिन्यात 2665.48 लक्ष व मे महिन्यात 4708.09 लक्ष एव्हढा मदत निधी वितरित झाला. काहींना मदत मिळाली नसल्यास त्यासाठी मंत्रालयाच्या दालनात विशेष बैठक आयोजित करून राहिलेला विषय मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
