मुक्ताईनगरात श्री संत मुक्ताई पालखीचे जल्लोषात स्वाग
Shree Sant Muktai Palkhi welcomed in Muktai Nagar मुक्ताईनगर : पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेवून परतलेल्या शहरातील श्री संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे रविवारी श्री क्षेत्र कोथळी आगमन झाल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी मुक्ताई पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता. रविवारी सकाळी 10 वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान नव्या मुक्ताई मंदिरावरून मूळस्थानी श्री क्षेत्र कोथळीकडे रवाना झाला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी पालखी पूजन करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, विश्वस्त पंजाबराव पाटील, संदीप पाटील, अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, निवृत्ती पाटी, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी तहसीलदार आदी उपस्थित होते. यपालखी सोहळा जुने मुक्ताई मंदिराकडे मार्गस्थ झाला. शाही स्वरूपात पालखी सोहळा अतिशय थाटात निघाला. मुक्ताईनगर प्रवेश द्वारावर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहर प्रवेश प्रसंगी प्रभारी नगराध्य मनीषा पाटील, प्रवीण पाटील, नगरसेवक आणि नगरपंचायत कर्मचार्यांनी स्वागत केले.पालखी मार्गावर पालखीच्या आगमनानिमित्त नवे मुक्ताई मंदिर ते जुने मुक्ताई मंदिर मार्गावर शहरवासीयांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले.

रांगोळ्या काढून व पताका लावून पालखीचे स्वागत
पालखी मार्गावर अनेक ठिकाणी विविध राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे तसेच व्यापारी वर्गातर्फे स्वागतपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पालखी मार्गावर श्री स्वामी समर्थ केंद्र जुनेगावतर्फे सेवेकरी महिला व मुलींनी आकर्षक रांगोळ्या काढून सेवा दिली. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाजवळ अॅड.रोहिणी खडसे यांच्यातर्फे दिंड्या मधील वारकर्यांना हरीपाठ भेट देण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे प्रत्येक दिंडीला एक हजार रुपये आर्थिक भेट देण्यात आली. सिव्हिल सोसायटी तर्फे मुक्ताई पालखीतील वारकर्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यांचे पालखी सोहळा यशस्वीतेसाठी परीश्रम
पालखी सोहळा यशस्वीतेसाठी हभप रवींद्र हरणे महाराज, हभप नितीन महाराज, हभप विशाल महाराज खोले, संदीपभैय्या पाटील, विनायकराव हरणे, पालखी उत्सव समिती अध्यक्ष पुरूषोत्तम वंजारी, निवृत्ती पाटील, ज्ञानेश्वर हरणे, सुधाकर सापधरे, सदाशीव पाटील, उमेश राणे, श्रीकांत पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी परीश्रम घेतले. जुन्या मंदिरावर पालखी सोहळा पोहोचल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता हभप रवींद्र हरणे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाले.
वारकरी दिंडी स्पर्धेचा निकाल असा
बालगट प्रथम- मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, कोथळी द्वितीय- मुक्ताई कन्याभजनी मंडळ, म्हैसवाडी, ता.मलकापूर, तृतीय- जिजाऊ कन्या भजनी मंडळ, अनुराबाद, ता.मलकापूर, महिलागट प्रथम- वियोगी महिला भजनी मंडळ, पळसोडा, ता.नांदुरा, द्वितीय- जय गजानन महिला भजनी मंडळ, देवधाबा, ता.मलकापूर, तृतीय- मुक्ताई महिला भजनी मंडळ, पिंप्रीअकराऊत. पुरुष गट- प्रथम- अहिल्यादेवी हरीपाठ मंडळ, मुक्ताईनगर. द्वितीय-
सदगुरु आवली बाबा भजनी मंडळ, सोनाळा, तृतीय- हनुमान भजनी मंडळ, लोणी, जामनेर
